प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर

 

large_Arjunwadkar_sir_1.jpg

प्रा. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर हे महाराष्ट्रातील व्यासंगी अभ्यासक म्हणून विख्यात आहेत. संस्कृत वाङ्मय, भारतीय तत्त्वज्ञान, साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण, शुद्ध लेखन अशा विविध विषयांचा साक्षेपाने आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे विद्वान म्हणून ते ज्ञात आहेत. नेटक्या शास्त्रीय लेखनाबरोबरच, संपादन, मुद्रण अशा क्षेत्रांतही त्यांनी आपली नाममुद्रा उमटवलेली आहे.

 


व्यक्तिगत तपशील


 • ३१ ऑक्टोबर १९२६ बेळगाव येथे जन्म. आई : जानकी, वडील : श्रीनिवास
 • १९५४ लीला देव ह्यांच्याशी विवाह
 • मृत्यू : ३० जुलै २०१३

 


विद्याशाखीय कर्तृत्व


  • १९४१ पारंपरिक पद्धतीने अद्वैत-वेदान्त-कोविद ही पदवी
  • १९४६ मुंबई विद्यापीठाची शालान्त परीक्षा उत्तीर्ण. संस्कृत ह्या विषयात सर्वाधिक म्हणजे १०० पैकी ९६ गुण मिळवून जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती प्राप्त
  • १९५१ संस्कृत आणि हिंदी हे विषय घेऊन बी. ए, ही पदवी
  • १९५६ पुणे विद्यापीठातून संस्कृत आणि अर्धमागधी हे विषय घेऊन एम. ए. ही पदवी

 


भूषवलेली पदे


 • १९५५ ते १९६० नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे येथे संस्कृत आणि अर्धमागधी ह्या विषयांचे व्याख्याते
 • १९५६-१९५७ भारत सरकारच्या संस्कृत आयोगाचे (संस्कृत कमिशनचे) तांत्रिक साहाय्यक
 • १९६१-१९८९ सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे संस्कृतचे व्याख्याते म्हणून कार्यरत
 • १९७३-१९७४ ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ, व्हाङ्कोवर, कॅनडा येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत
 • १९७५-१९९० प्रारंभी ज्ञानप्रबोधिनी, पुणे ह्या संस्थेचे एक अंग असलेल्या, नंतर एक स्वतंत्र घटक म्हणून विकसित होऊन पदव्युत्तर संशोधनाचे केंद्र म्हणून  पुणे विद्यापीठाची मान्यता लाभलेल्या, संस्कृत आणि भारतीय संस्कृती ह्यांसंबंधीचे संशोधन आणि विकास ह्यांसाठी प्रयत्नरत असलेल्या, 'संस्कृत-संस्कृति-संशोधिका' (संत्रिका) ह्या संस्थेचे मानद संचालक
 • १९८१, जानेवारी होमी भाभा फेलोशिप काउंसिल, मुंबई येथे निवडसमितीत काम
 • १९७९, जून २१ पुणे विद्यापीठाचे संस्कृत ह्या विषयासाठी पीएचडीचे मार्गदर्शक म्हणून मान्यता
 • १९७९-१९८६ मुंबई विद्यापीठात मराठीचे प्रपाठक
 • १९८०, जानेवारी २१ मुंबई विद्यापीठाकडून मराठी ह्या विषयासाठी पीएचडीचे मार्गदर्शक म्हणून मान्यता

 


परिषदांतील सहभाग आणि व्याख्याने


 • १९८७, नोव्हेंबर २० एशियाटिक सोसायटी, मुंबई येथे 'अ‍ॅन इपिस्टिमॉलॉजिकल सर्च इन टू दि रस थियरी'' ह्या विषयावरील डॉ. पां. वा. काणे स्मारक व्याख्यान
 • १९९९-२००० 'दि योग पाथ' लंडन येथे योगतत्त्वज्ञानावर व्याख्यान. जर्मनी, बेल्जियम आणि युनायटेड किंग्डममधील अन्य ठिकाणी योग ह्या विषयावरील व्याख्यानांच्या निमित्ताने भ्रमण
 • १९९९, मे ८,९ भारतीय-विद्या-भवन, लंडन येथे दोन व्याख्याने १९९९-२००० 'दि योग पाथ' लंडन येथे योगतत्त्वज्ञानावर व्याख्यान. जर्मनी, बेल्जियम आणि युनायटेड किंग्डममधील अन्य ठिकाणी योग ह्या विषयावरील व्याख्यानांच्या निमित्ताने भ्रमण
 • १९९९, मे ८,९ भारतीय-विद्या-भवन, लंडन येथे दोन व्याख्याने : १. प्राकृत अ‍ॅण्ड मॉडर्न इण्डियन लॅंग्वेजेस्  २. सम इंट्रेस्टिंग एपिसोड्स् फ्रॉम उपनिषद्स्
 • २००२, सप्टेंबर २१ केंब्रिज विद्यापीठ, यु.कि. येथे ७व्या आंतरराष्ट्रीय डीएचआयआयआर परिषदेत प्रारंभिक सत्रात द रिलेव्हन्स ऑफ योग टुडे ह्याविषयावरील निबंधाचे वाचन
   

गौरव/ पुरस्कार


 • १९६४ मम्मटाच्या काव्यप्रकाशाच्या चिकित्सक आवृत्तीच्या संपादनासाठी प्रा. अरविंद मंगरूळकर आणि प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांना  महाराष्ट्र-शासनाचा समीक्षेसाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार
 • १९७२ राष्ट्रीय स्तरावरील लेखक म्हणून नोंद (हूज हू, नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली)
 • १९७८ आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखक म्हणून नोंद (इंटरनॅशनल ऑथर्स अ‍ॅण्ड रायटर्स हूज हू, इंटरनॅशनल बायोग्राफिकल सेंटर, केंब्रिज, इंग्लंड)
 • १९९२, ऑक्टोबर 'मराठी व्याकरणाचा इतिहास' ह्या ग्रंथासाठी साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार
 • २०००, फेब्रुवारी संस्कृत भाषेच्या लक्षणीय सेवेबद्दलचा 'आचार्य पाणिनि पुरस्कार
 • २०००, ऑगस्ट शिक्षणक्षेत्रातील लक्षणीय कामगिरीबद्दल 'श्रीमंत दगडूशेट हलवाई कृतज्ञता पुरस्कार
 • २००४, ऑगस्ट, २९ संस्कृतभाषेच्या लक्षणीय सेवेबद्दल महाराष्ट्र-शासनाचा कालिदास पुरस्कार
 • २००४, ऑगस्ट, ३० संस्कृतभाषेच्या लक्षणीय सेवेबद्दल टिळक-महाराष्ट्र-विद्यापीठाचे इंदिरा बेहेरे सुवर्णपदक
 • २००४, ऑक्टोबर, ३१ वक्तृत्वोत्तेजक सभा, पुणे ह्यांच्याकडून संस्कृत भाषेच्या तसेच इतर ज्ञानक्षेत्रांतल्या लक्षणीय सेवेकरता गौरव
 • २००५, फेब्रुवारी, १३ पुणे आणि कोथरूड येथील देवदेवेश्वर संस्थानाकडून श्रीमंत नानासाहेब पेशवे पुरस्कार
 • २००५, ऑगस्ट, २३ ज्ञानप्रबोधिनी, पुणे ह्यांच्याकडून डॉ. जयश्री गुणे पुरस्कार

 


उपक्रम


 • १९८७, एप्रिल २१-२७ महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षक ह्यांसाठी मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या वतीने मराठी व्याकरण आणि शुद्ध लेखन ह्यांतील समस्या ह्या विषयावरील विद्यापीठ-अनुदान-आयोग-पुरस्कृत परिसंवादाचे आयोजन
 • १९८९ 'ज्ञानमुद्रा' ह्या अक्षरजुळणी केंद्राची स्थापना (प्रथमतः श्रीमती सुचिता आपटे आणि नंतर श्री. गौतम घाटे ह्यांच्या सह भागीदारीत. २००० साली बंद होईपर्यंत विविध भाषांतील अनेक महत्त्वपूर्ण पुस्तकांची अक्षरजुळणी.)
   

लेखनसंभार


प्रा. अर्जुनवाडकर ह्यांचे ग्रंथ

प्रा. अर्जुनवाडकर ह्यांचे लेख/ भाषणे


छायाचित्रणाचा छंद


प्रा. अर्जुनवाडकर ह्यांनी काढलेली निवडक छायाचित्रे इथे पाहा.