ज्ञानकोश

ज्ञानकोश म्हणजे ज्ञानाचा संग्रह. एखाद्या विषयावरील माहितीचा संगतवार प्राथमिक परिचय करून घेण्यासाठी ज्ञानकोश हे उपयुक्त साधन आहे. ज्ञानकोश सर्वसामान्य स्वरूपाचे असतात तसेच विशिष्ट विषयांचेही असतात.


 

मराठी विकिपीडिया (मुक्त ज्ञानकोश); विकिमीडिया फाउंडेशन;

हा मुक्त ज्ञानकोश असून तो लोकसहभागातून घडणारा आहे. त्यातील नोंदी लोक लिहितात आणि संपादित करतात. हा कोश उत्तम दर्जाचा व्हावा ह्यासाठी त्यात विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा सहभाग वाढायला हवा.

[ दुवा


 

मराठी विश्वकोश; सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई

हा ज्ञानकोश युनिकोडात शोधण्याजोग्या स्वरूपात मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

[ दुवा ]


 

महाराष्ट्रीय ज्ञानकोश; संपा. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर; महाराष्ट्रीय- ज्ञानकोश-मंडळ, पुणे

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ह्या संस्थेने हा ज्ञानकोश आता संगणकीय स्वरूपात उपलब्ध करून दिला असून आता हा ज्ञानकोश युनिकोडात शोधण्याजोग्या स्वरूपात पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

[ दुवा ]