शब्दसंग्रह/ शब्दकोश

ह्या विभागात महाजालावर मराठीत उपलब्ध असलेले विविध शब्दसंग्रह उदा. मराठी शब्दकोश, शब्दावल्या ह्यांची माहिती संकलित केली आहे. ही सामग्री विविध स्वरूपात उपलब्ध आहे.  ही सामग्री मराठीत आहे म्हणजे त्यातील किमान एक भाषा मराठी आहे. सामग्रीेचे स्वरूप त्या त्या ठिकाणी विवरून सांगितले आहे.

सामग्रीची मांडणी करताना खालील क्रम अनुसरला आहे.

प्रत्येक विभागातील अंतर्गत मांडणी त्या त्या शीर्षकानुसार देवनागरी लेखनातील वर्णक्रमाप्रमाणे केली आहे.

मराठी > मराठी

मराठी शब्दकोश : महाराष्ट्र-राज्य-साहित्य-आणि-संस्कृति-मंडळ, मुंबई

हा एकंदर ६ खंडातील मराठी-मराठी शब्दकोश असून त्याचे पहिला ते चौथा हे भाग महाजालावर उपलब्ध आहेत. ह्याची युनिकोड-आधारित अशी महाजालावर शोधता येण्याजोगी आवृत्ती मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. [दुवे]

मराठी शाब्दबंध; भारतीय-भाषा-तंत्रज्ञान-केंद्र  (सी.एफ.आय.एल.टी.), २००२ - वर्तमान; भारतीय तंत्रज्ञान-सस्था (आय. आय. टी.), मुंबई

हा भाषागत संकल्पनांचा कोश आहे. ह्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. शब्दकोश आणि पर्यायकोश ह्यांचा समन्वय साधण्याचा ह्यात प्रयत्न दिसतो. प्रत्येक नोंद ही संकल्पनेची असून तिचे वाचक (समानार्थी) शब्द संच म्हणून एकत्र आणण्यात आलेले आहे. हे संच विविध संबंधांनी परस्परांशी जोडण्यात येतात. उदा. समावेशक-समाविष्ट-संबंध उदा. हापूस (समाविष्ट) - आंबा (समावेशक)

हा कोश पुढील दुव्यावर उपलब्ध आहे. [दुवा]

महाराष्ट्र-शब्दकोश; विभाग पहिला ते सातवा; संपा. यशवंत रामचंद्र दाते, चिंतामण गणेश कर्वे, आबा चांदोरकर आणि इतर; १९३२-१९३८; य. रा. दाते; पुणे

[भाषा : मराठी > मराठी; लिपी : देवनागरी]

+ पुरवणी विभाग; विभाग आठवा; संपा. यशवंत रामचंद्र दाते, चिंतामण गणेश कर्वे; १९५०;  य. रा. दाते; पुणे

शब्दसंख्या अंदाजे १,१२,०३१. ह्या कोशात मध्ययुगीन मराठी ग्रंथांपासून कोशरचनाकाळापर्यंतच्या शब्दांचा संग्रह आहे. मराठीच्या विविध बोलींतील शब्दांचा समावेश ह्या कोशात आहे. आवश्यक तिथे अवतरणेही देण्यात आलेली आहेत. विभाग १ ते ७ ह्यांतील प्रस्तावनांतही मराठीभाषाविषयक विविधांगी मजकूर संकलित करण्यात आला आहे.

ह्या कोशाच्या महाजालावरील आवृत्त्या खालील प्रमाणे

शिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरीज ऑफ साउथ आशिया ह्या संकेतस्थळावर हा कोश युनिकोड संकेतप्रणालीतील मजकुरात शोधता येण्याजोग्या स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]  ह्या ठिकाणी कोशातील शब्द शोधण्याची सोय दिलेली आहे. कोशाच्या प्रस्तावनांचा मजकूर दिलेला नाही.

ह्या कोशाच्या विविध विभागांच्या प्रतिमांच्या धारिका खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. ह्या धारिका मुद्रित प्रतीच्या प्रतिमा असल्याने त्यांत प्रस्तावनांचाही समावेश आहे.

* उविडिग्रं = उस्मानिया विद्यापीठाचे डिजिटल ग्रंथालय

* डिलाइं = डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया

विभाग पहिला (अ - ऐ) । डिलाइंउविडिग्रं

विभाग दुसरा (ओ - ख) । डिलाइंउविडिग्रं

विभाग तिसरा (ग - ठ) । डिलाइं ।उविडिग्रं ।

विभाग चवथा (ड - न) । डिलाइंउविडिग्रं

विभाग पाचवा (प - भ) । डिलाइंउविडिग्रं

विभाग सहावा (म - वृ) । डिलाइंउविडिग्रं

विभाग सातवा (वे - ज्ञ) । डिलाइंउविडिग्रं

विभाग आठवा (अ - ज्ञ) । डिलाइंउविडिग्रं

मराठी > मराठी, अन्य भाषा

डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी; शंकर गोपाळ तुळपुळे आणि अॅन फेल्डहाऊस; १९९९; पॉप्युलर प्रकाशन; मुंबई

[भाषा : मराठी > मराठी, इंग्लिश (केवळ अर्थनोंदींत); लिपी : देवनागरी, रोमी (केवळ अर्थनोंदींत)]

ह्या कोशात मध्ययुगीन मराठीतील शब्दांचे मराठीत आणि इंग्लिशेत अर्थ देण्यात आले आहेत. आवश्यक तिथे अवतरणेही देण्यात आली आहेत.

शिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरीज ऑफ साउथ आशिया ह्या संकेतस्थळावर हा कोश युनिकोड संकेतप्रणालीतील मजकुरात शोधता येण्याजोग्या स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

मराठी > अन्य भाषा

आर्यभूषण स्कूल डिक्शनरी; श्रीधर गणेश वझे; १९११; आर्यभूषण प्रेस; पुणे

[भाषा : मराठी > इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी (अर्थनोंदींत)]

शिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरीज ऑफ साउथ आशिया ह्या संकेतस्थळावर हा कोश युनिकोड संकेतप्रणालीतील मजकुरात शोधता येण्याजोग्या स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

ए कम्पेण्डियम् ऑफ मोल्सवर्थ्स मराठी-इंग्लिश डिक्शनरी; जेम्स थॉमस मोल्सवर्थ; बाबा पदमनजी (संपा.); १८६३; एज्युकेशन सोसायटीचा प्रेस; मुंबई

[भाषा : मराठी > इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी (अर्थनोंदींत)]

मोल्सवर्थकृत मराठी-इंग्लिश कोशाची ही बाबा पदमनजी ह्यांनी संपादलेली संक्षिप्त आवृत्ती आहे. त्यात मोल्सवर्थाच्या कोशातील शब्दसंख्येच्या निम्म्या संख्येने शब्द आहेत.

हा कोश गूगलबुक्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. [ दुवा ]

ए डिक्शनरी ऑफ मराठी अॅण्ड इंग्लिश; जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि थॉमस कॅण्डी; १८३१; गव्हर्न्मेंट ऑफ बॉम्बे; मुंबई

[भाषा : मराठी > इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी (अर्थनोंदींत)]

[ गूगल बुक्स ]

ए डिक्शनरी ऑफ मराठी अॅण्ड इंग्लिश; आ. २ (सुधारित); जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि थॉमस कॅण्डी; १८५७; गव्हर्न्मेंट ऑफ बॉम्बे; मुंबई

[भाषा : मराठी > इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी (अर्थनोंदींत)]

शब्दसंख्या सुमारे ६०,०००

शिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरीज ऑफ साउथ आशिया ह्या संकेतस्थळावर हा कोश युनिकोड संकेतप्रणालीतील मजकुरात शोधता येण्याजोग्या स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

हा कोश प्रतिमांच्या स्वरूपातही पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गूगल बुक्स

ए बेसिक मराठी-इंग्लिश डिक्शनरी; मॅक्सिन बर्न्सन; १९८२-१९८३; अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज; नवी दिल्ली

[भाषा : मराठी > इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी (अर्थनोंदींत)]

शिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरीज ऑफ साउथ आशिया ह्या संकेतस्थळावर हा कोश युनिकोड संकेतप्रणालीतील मजकुरात शोधता येण्याजोग्या स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

शासन-व्यवहार-शब्दावली; भाषा-सल्लागार-मंडळ; २००५; भाषासंचालनालय; मुंबई

[भाषा : मराठी > इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी ]

शासन-व्यवहार-कोशाचे मराठी > इंग्लिश रूपांतर.

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

अन्य भाषा > मराठी

अर्थशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, अर्थशास्त्र-परिभाषा-कोश-उपसमिती; १९८७; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात अर्थशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

कृषिशास्त्र-परिभाषा-कोश; कृषिशास्त्र-परिभाषा-समिती; १९८३ (पु.मु. १९८७); भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात कृषिशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

गणितशास्त्र-परिभाषा-कोश; आ.२री (सुधारित); भाषा-सल्लागार-मंडळ, गणितशास्त्र-उपसमिती; १९९७; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात गणिताशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

ग्रंथालयशास्त्र-परिभाषा-कोश; आ.२री (सुधारित); भाषा-सल्लागार-मंडळ, ग्रंथालयशास्त्र-उपसमिती; १९९४; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात ग्रंथालयशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

जीवशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, वनस्पतिशास्त्र-परिभाषा-उपसमिती आणि प्राणिशास्त्र-परिभाषा-उपसमिती; १९८४; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र ह्या दोन क्षेत्रांतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

तत्त्वज्ञान-व-तर्कशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ; १९७६ (पु.मु. २००९); भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र ह्या दोन क्षेत्रांतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

न्यायवैद्यक-व-विषशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, न्यायवैद्यक-व-विषशास्त्र-उपसमिती; २००५; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात न्यायवैद्यक आणि विषशास्त्र ह्या क्षेत्रांतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

न्यायव्यवहारकोश; विधि-अनुवाद-व-परिभाषा-सल्लागार-समिती; २००८; भाषासंचालनालय; मुंबई

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

ह्या कोशात विधिव्यवहारात वापरण्यात येणारे इंग्लिश पारिभाषिक शब्द, वाक्प्रयोग, शब्दसमुच्चय ह्यांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

भाषाविज्ञान-व-वाङ्मयविद्या-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, भाषाशास्त्र-उपसमिती; २००१; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात भाषाविज्ञान आणि वाङ्मयविद्या ह्या क्षेत्रांतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

भूगोलशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, भूगोलशास्त्र-उपसमिती; २००१; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात भूगोलशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

भूशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, भूशास्त्र-उपसमिती; १९७७ (पु.म १९८८); भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात भूशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

भौतिकशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, भौतिकशास्त्र-उपसमिती; १९८१ (पु.मु. १९८८); भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात भौतिकशास्त्रातील/ पदार्थविज्ञानातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

मानसशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, मानसशास्त्र-परिभाषा-कोश-उपसमिती; १९९१; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात मनोविज्ञानातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

यंत्र-अभियांत्रिकी-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, यंत्र-अभियांत्रिकी-उपसमिती; १९८० (पु.मु. १९८८); भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात यंत्र-अभियांत्रिकीतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

रसायनशास्त्र-परिभाषा-कोश; आ. २री (सुधारित) भाषा-सल्लागार-मंडळ, रसायनशास्त्र-उपसमिती; १९९५; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात रसायनशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

राज्यशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, राज्यशास्त्र-उपसमिती; १९८६; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात राज्यशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

वाणिज्यशास्त्र-परिभाषा-कोश; आ. २री भाषा-सल्लागार-मंडळ, वाणिज्यशास्त्र-उपसमिती; १९८५; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात वाणिज्यशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

विकृतिशास्त्र-पारिभाषिक-शब्दावली; भाषा-सल्लागार-मंडळ, विकृतिशास्त्र-उपसमिती; २००२; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात विकृतिशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

वित्तीय शब्दावली; भाषा-सल्लागार-मंडळ; १९७२; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात वित्त ह्या क्षेत्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

विद्युत-अभियांत्रिकी-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, विद्युत-अभियांत्रिकी-उपसमिती; १९८२ (पु.मु. १९८८); भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात विद्युत-अभियांत्रिकीतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

वृत्तपत्रविद्या-परिभाषा-कोश; २००३; वृत्तपत्रविद्या-परिभाषा-कोश-समिती; १९८३ (पु.मु. १९८७); भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात वृत्तपत्रविद्येतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

व्यवसाय-व्यवस्थापन-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, व्यवसाय-व्यवस्थापन-उपसमिती; १९९४; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात व्यवसाय-व्यवस्थापन ह्या क्षेत्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

शरीरक्रियाशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, शरीरक्रियाशास्त्र-समिती; १९८४; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात शरीरक्रियाशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

शारीर-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, शारीर-उपसमिती; १९८७; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात शारीर (अॅनाटॉमी) ह्या विषयातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

शासन-व्यवहार-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ; १९७३; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात शासनव्यवहारातील इंग्लिश पारिभाषिक शब्द, वाक्प्रयोग, शब्दसमुच्चय ह्यांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

शिक्षणशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, शिक्षणशास्त्र-उपसमिती; १९८० (पु.मु. १९८८); भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात शिक्षणशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

संख्याशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, संख्याशास्त्र-उपसमिती; १९९६; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात संख्याशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

समाजशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, समाजशास्त्र-उपसमिती; १९७४; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात समाजशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

साहित्य-समीक्षा-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, साहित्य-समीक्षा-परिभाषा-कोश-उपसमिती; १९८७; भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात साहित्य-समीक्षेतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

स्थापत्य-अभियांत्रिकी-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, स्थापत्य-अभियांत्रिकी-उपसमिती; १९८० (पु.मु. १९८८); भाषासंचालनालय; मुंबई

ह्या कोशात स्थापत्य-अभियांत्रिकीतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.

[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

मराठी <> अन्य भाषा

पदनामकोश; आ. २; भाषा-सल्लागार-मंडळ; १९९०; भाषासंचालनालय; मुंबई

[भाषा : इंग्लिश > मराठी आणि मराठी > इंग्लिश; लिपी : रोमी, देवनागरी]

ह्या कोशात शासनव्यवहारातील विविध इंग्लिश पदनामांचे तसेच संस्था, कार्यालये, मंडळे ह्यांच्या नावांचे मराठी पर्याय देण्यात आले आहे. कोशाची विभागणी पुढीलप्रमाणे आहे.

  • पदनामांची सूची (इंग्लिश > मराठी)
  • पदनामांची सूची (मराठी > इंग्लिश)
  • संस्था, कार्यालये, मंडळे इत्यादींची सूची (इंग्लिश > मराठी)
  • संस्था, कार्यालये, मंडळे इत्यादींची सूची (मराठी > इंग्लिश)

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

प्रशासन-वाक्प्रयोग; भाषा-सल्लागार-मंडळ; १९६४; भाषासंचालनालय; मुंबई

[भाषा : इंग्लिश > मराठी आणि मराठी > इंग्लिश; लिपी : रोमी, देवनागरी]

ह्या पुस्तकात प्रशासनातील इंग्लिश संज्ञा आणि वाक्प्रयोग ह्यांचे मराठी पर्याय देण्यात आले आहे. तसेच मराठी पर्यायांच्या मूळ इंग्लिश संज्ञा आणि वाकप्रयोगही देण्यात आले आहेत.

हा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]

मराठी भाषा.ओआरजी (भाषासंचालनालयाचा पारिभाषिक शब्दसंग्रह) :

[भाषा : मराठी <> इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी ]

ह्या संकेतस्थळावर भाषासंचालनालयाच्या विविध शब्दसंग्रहांचा एकत्रित संग्रह आहे. त्यात मराठी विश्वकोशाच्या परिभाषाकोशाचाही समावेश आहे. ह्यात मराठी संज्ञांचे इंग्लिश पर्याय आणि इंग्लिश संज्ञांचे मराठी पर्याय युनिकोड संकेतप्रणालीत शोधण्याजोग्या स्वरूपात दिलेले आढळतात [दुवा]